कोकण हे स्वामी भक्तांचे ‘माहेरघर’ ; महेश इंगळे यांचे गौरवोद्गार 

कोकण दौऱ्यात भाविकांना महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ

हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती आणि सेवेचा संगम अनुभवला : महेश इंगळे 

सिंधुदुर्ग : पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या महानगरीय शहरांमध्ये स्वामी भक्तांची लक्षणीय संख्या असली तरी कोकण हे स्वामी भक्तांचे माहेरघर आहे. या माध्यमातून जोगेश्वरी येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार संचलित कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती आणि सेवेचा संगम पहावयास मिळाला असल्याचे मनोगत अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. 

नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व श्री स्वामी समर्थ भक्ती परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ हडपिड मठ यांच्या सौजन्याने महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवार यांच्या आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कोकण दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान या श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थाना वरील श्री स्वामी समर्थांचे नित्य दिनक्रम व वर्षभरात मंदिरात साजरे होणारे उत्सव इत्यादी बाबत चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ मठात भाविकांना मार्गदर्शनपर माहिती दिली. त्यावेळी महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हडपिड मठाच्या वतीने श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व सर्व मित्र परिवार सदस्यांचा स्वामी समर्थांचे वस्त्र, हडपिड मठ स्वामी समर्थांची प्रतिमा असलेले सन्मान चिन्ह देऊन हडपिड मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी यथोचित सन्मान केला. 

यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेही चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनीही हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, विश्वस्त ज्ञानेश्वर राऊत, विश्वस्त मोहनिष पेडणेकर, अभिषेक राणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर यांचे वडील कै. तुकाराम कृष्णा पेडणेकर हे पण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते. या माध्यमातूनच त्यांनी आपले चिरंजीव व हडपिड मठाचे विद्यमान सचिव नंदकुमार पेडणेकर यांना स्वामी भक्तीचा अनुग्रह दिला. पुढे या माध्यमातून सचिव नंदकुमार पेडणेकर हे स्वामी भक्तीत तल्लीन होत कोकणवासिय भाविकांना स्वामी भक्तीच्या प्रचार प्रसार कार्यात आणण्याचे कार्य सुरू केले. या माध्यमातून त्यांनी १५ वर्षांपुर्वी हडपीड येथे श्री स्वामी समर्थ मठाची निर्मिती करण्याचा संकल्प माझ्यासमोर व्यक्त केला होता. त्यांचा संकल्प सिद्धीस जावा व हडपीडसह कोकणात श्री स्वामी समर्थांचा भक्त परिवार वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने काही वर्षांपूर्वी मी त्यांना हडपिड येथे स्वामी समर्थ मठाचे स्थापना करण्यास मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन हडपिड सारख्या अत्यंत डोंगराळ व निसर्गरम्य परिसरात त्यांनी सुंदर असे श्री स्वामी समर्थांचे मंदिर साकारुन सहकाऱ्यांसह आपली सेवा रुजू केलेली आहे. आज हडपिड येथील या श्री स्वामी समर्थांच्या मठामुळे कोकणातील स्वामीभक्त परिवार वाढत आहे. सर्व स्वामी भक्तांना अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान येथील व हडपिड स्वामी समर्थ मठात, कोकणातील भाविक नेहमीच स्वामी दर्शनाचा लाभ घेत आहेत. याचे सर्वात मोठे समाधान सचिव नंदकुमार पेडणेकर यांना असल्याचे मनोगत व्यक्त केले. आम्हाला येथे आमंत्रित करून जी सेवा दिली ती अमूल्य आहे. दिलेल्या सेवेप्रित्यर्थ आपण भारावलो असल्याचे मनोगतही व्यक्त करून हडपीड मठाच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. 

यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष पराणे, नंदकुमार घाटगे, कुमार हत्तुरे, सुरेश वाले, रवि कदम, अंकूश केत, सुनिल पवार, स्वामीनाथ मुसळे, मनोज इंगुले, बाबा सुरवसे, ओंकार वाले, शेखर अडवितोटे, प्रसन्न हत्ते, साहील पवार, नामदेव माने, विश्वनाथ देवरमनी, शिवू बिडवे, कणबसे शेठ, मेजर अमोल माने, श्रीशैल गवंडी, मनोज जगताप सर, संदीप पंडीत, रामलिंग स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, विभूते नंदकुमार कटारे, तुषार मोरे, ओंकार महाडीक, शंकर मलवे, आशिश सातपूते, स्वप्निल गायकवाड, महेश पाटील, राजू स्वामी, अरुण शिंदे, मल्हारी पवार, बंटी नारायणकर, रमेश शिंदे सर, कॄष्णा गवळी, श्रीकांत नाईकवडी, राजाभाऊ इंगळे, महेश मस्कले, लखन सुरवसे, सागर हसापूर, आकाश चुंगीकर, अथर्व इंगळे, समर्थ गवळी, समर्थ भोसले, समर्थ पराणे, आदीत्य गवंडी, प्रसाद माने, युवराज सोनटक्के, दर्शन घाटगे, राज प्रज्वल गवंडी, रजत गायकवाड, धनराज स्वामी, तन्मय इचगे, श्रीनाथ पराणे, शेखर मिनगले, शुभम बिडवे, अनंत हिरेमठ व हडपीड मठाचे संस्थापक प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, व मठाचे सेवेकरी व भाविक भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!