
मालवण, कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून १६ ठिकाणी विकासनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण : मालवण-कुडाळ तालुक्यातील १६ ठिकाणी समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्माण करणे यासाठी सुमारे २ कोटी ७० लाख निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
विकासनिधी मंजुरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.
मंजूर कामांमध्ये किर्लोस चव्हाणवाडी समाजमंदिर इमारत बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष, कुणकवळे बौद्धवाडी समाज मंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण १० लक्ष, सुकळवाड पाताडेवाडी समाजमंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण १० लक्ष, डिगस येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, सिंधुदुर्गनगरी ओरोस बौध्दवाडी येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, बाव आंबेडकरनगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, केरवडे तर्फ माणगाव येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, आंब्रड तांबेवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, नारूर हरिजनवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ २० लक्ष, वेताळ बांबर्डे कपिल नगर समाज मंदिर विस्तारीकरण व अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. कुडाळ १० लक्ष, असगणी बौद्धवाडी येथे २ सोलर हायमास्ट उभारणे. ता. मालवण १० लक्ष, कांदळगाव बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष, ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर रमाईनगर मागासवर्गीय वस्ती मध्ये २ सोलर हायमास्ट बसविणे. ता. मालवण १० लक्ष, ओवळीये बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २०, वायंगणी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २०, वडाचापाट येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण २० लक्ष असा निधी मंजूर करण्यात आला आहे.







Subscribe to my channel






