जि. प., पं. स. निवडणूक | भाजप – शिवसेनेची उद्या कणकवलीत संयुक्त बैठक

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मालवण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकारणीची संयुक्त बैठक शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रहार भवन कणकवली येथे होणार आहे. या बैठकीला खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रहार भवन, कणकवली येथे खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदरच्या दोन्ही बैठका ह्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केल्या आहेत. तरी वरील बैठकीला दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.

तसेच सायंकाळी ५ वा. प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेला खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री नाम. नितेश राणे, आ. दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभाकर सावंत व दत्ता सामंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!