दत्ता तिथे सत्ता ; विरोधकांचा कट झाला पत्ता !
प्रतिष्ठेच्या हिवाळे – ओवळीये – शिरवंडे सोसायटीवर भाजपची एकहाती सत्ता ; विरोधकांचा सुपडा साफ
भाजप नेते दत्ता सामंत यांचे नेतृत्व आणि माजी गटनेते सुनील घाडीगांवकर यांची रणनीती फळाला
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या हिवाळे – ओवळीये – शिरवंडे विविध सेवा सहकारी संस्थेच्या सर्व १३ पैकी १३ ही जागा जिंकत भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलने या सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली पं. स. चे माजी गटनेते सुनील घाडीगांवकर यांची रणनीती याठिकाणी फळाला आली.
या संस्थेवरील निर्विवाद विजयासाठी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, विभाग अध्यक्ष प्रशांत सावंत, दादा परब, विश्वास परब, रघु गावकर, नयन कुलकर्णी, समीर सावंत, शंकर धुरी, तुषार हाटले, बबन परब, पांडुरंग धुरी, रमेश धुरी, विजय पवार, संतोष कदम, सुभाष सावंत, जनार्दन पळसंबकर यासह अन्य ग्रामस्थ, शेतकरी, मतदार यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया सुनील घाडीगांवकर यांनी दिली आहे. हा विजय जनतेचा, शेतकऱ्यांचा, मतदारांचा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या संस्थेवर भाजपा पुरस्कृत पॅनलच्या नंदकुमार मनोहर आंगणे, सुरेश श्रीधर गावकर, रघुनाथ सीताराम गावडे, संजय बाळकृष्ण घाडीगांवकर, विजय काशीराम खांडेकर, मंगेश गिरीधर लुडबे, दीपक शंकर पवार, श्रीकांत वासुदेव सावंत, पार्वती दत्ताराम धुरी, शिला संतोष निर्गुण, सत्यवान रामचंद्र जंगम, भगवान बाब्या जंगले, रामचंद्र सखाराम ओवळीयेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.