मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाची अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन मुंबई विद्यापीठाच्या २० व्या झोनल फेरी मधून मुंबईमध्ये अंतिम फेरीला निवड करण्यात आली आहे.


मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन परिषद अंतर्गत झोनल स्तरावर विद्यार्थ्यासाठी संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी ७ डिसेंबरला सिंधुदुर्गातील कणकवली कॉलेज कणकवली येथे घेण्यात आली. यावेळी अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन झोनल फेरीमध्ये सर्व स्तरावरून १५० प्रकल्प सादर करण्यात आले. त्यातील १५ प्रकल्पांची निवड करण्यात आली. ८ प्रकल्प हे अभियांत्रिकी आणि टेक्नॉलॉजीवर आधारित होते. त्यातील एम. आय.टी.एम. कॉलेजचा विद्यार्थी प्रथमेश यशवंत पालव याने सोलर पॉवर्ड हायब्रीड फ्लेक्सी-ई-कार चा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पासाठी त्याला कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्हि. ढणाल, प्रा.सौ तनवी सिंघम, प्रा. तानाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दोन ऊर्जास्रोत, इंधन बचत, पर्यावरणास अनुकूल, ऊर्जा वापर, एकाधिक स्रोतांद्वारे बॅटरी चार्जिंग इत्यादी सुविधांचा विचार करून हा प्रकल्प सादर केला आहे. यावेळी अविष्कार रिसर्च कॉलेजिएट झोनल फेरी मार्फत या प्रकल्पाची निवड मुंबईतील अंतिम फेरीसाठी करण्यात आली. एम.आय.टी.एम. कॉलेजच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाल, उपाध्यक्ष श्री. विनोद कदम, सेक्रेटरी सौ नेहा पाल, खजिनदार सौ. वृषाली कदम, संस्थेचे विश्वस्त श्री. केतन कदम यांनी अभिनंदन करत मुंबईतील अंतिम फेरी करिता शुभेच्छा दिल्या.

Subscribe to my channel




