भजनी बुवा समीर कदम यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या भजन विश्वावर शोककळा

माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे रविवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भजन, अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या योगदानातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

समीर कदम यांच्या निधनाची माहिती मिळताच ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले.

समीर कदम यांच्या निधनाने भजन परंपरेची मोठी हानी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आपल्या सुमधुर भजनातून आणि धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांतील सहभागातून त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. या दुःखद प्रसंगी वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.

error: Content is protected !!