रविना रेवंडकर यांना रहिवाशी संघ साईमंदिर मालवण कडून रोख ६६ हजारांची मदत

सौ. रेवंडकर ह्या पूर्वाश्रमीच्या धुरीवाडा येथील रहिवाशी : कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत ट्यूमरवर उपचार

मालवण : शहरातील दांडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४×२५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सौ. रेवंडकर या पूर्वाश्रमीच्या नंदा साळसकर असून धुरीवाडा साईनगरच्या त्या रहिवाशी होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून उपचाराचा खर्च त्याना परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर धुरीवाडा साईनगर रहिवाशी संघाच्यावतीने त्यांना रोख ६६ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. यातील ५० हजारांची रक्कम डॉक्टरांकडे तर उर्वरित १६ हजारांची मदत सौ. रेवंडकर यांचे पती रविंद्र रेवंडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

यावेळी राजू बिडये, महेश सारंग, निलेश तळाशीलकर, गणेश परब आणि रवींद्र रेवंडकर उपस्थित होते.

श्री. रेवंडकर हे मोलमजुरीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी रविना रविंद्र रेवंडकर (वय ४५ वर्ष) यांच्या पोटामध्ये २४×२५ mm चा ट्यूमर आहे आणि फुफुसामध्ये पाणी झाले आहे. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील डॉ. बिरमोळे यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ऑपरेशनला येणारा खर्च खूप जास्त असून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!