स्वखर्चातून एकाचवेळी १४ विकासकामे केली पुर्ण : ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी


अनेक ठिकाणी पायवाटांचेही काँक्रिटीकरण ; आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चिंदर गावात विकास कामांचा झंझावात सुरु आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून एकाचवेळी गावातील तब्बल १४ विकासकामे पुर्ण केली आहेत. ज्या वाडीत रस्ताच नव्हता, तिथे नव्या रस्त्याची उभारणी झाली असून अनेक मार्गांवर पायवाटांचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आमच्या घरापर्यत रस्ता येईल असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. ते आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी शक्य केले, असे सांगत ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
आमदार निलेश राणे यांनी मागील दीड वर्षाच्या आमदार कार्यकाळात शेकडो कोटी विकासनिधी मालवण कुडाळ तालुक्यात आणला आहे. जनतेची गरज ओळखून गतिमान विकासाला प्राधान्य दिले जात आहे. काही ठिकाणी अत्यावश्यक गरज ओळखून स्वखर्चातून जनतेची कामे पुर्ण करण्यात आली. मालवण तालुक्यातील चिंदर गावातही वाडीवस्तीवर ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता विकासकामे पुर्ण करण्यात आली आहेत. पावसाळी कालावधी लक्षात घेता तातडीने काही कामे पुर्ण करणे गरजेचे असल्याने आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून दत्ता सामंत यांनी १४ विकासकामे तात्काळ पुर्ण केली.
चिंदर गावातील विकासकामे
वाडीवाडीतील नवी रस्ता कामे प्राधान्याने करण्यात आली. लब्देवाडी रस्ता, साटमवाडी रस्ता, कुंभारवाडी स्मशान रस्ता, तेरई मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर, मुळेघर रस्ता, गावठवाडी (बागवाडी), मुख्य रस्ता ते गावडेपुरुष मंदिर रस्ता यांसह काँक्रिटकरण मध्ये सडेवाडी स्मशान रस्ता, गोसावीवाडी गणेश घाट रस्ता, देवकोंडवाडी, गोसावीवाडी पायवाट (घागरे घर) याठिकाणी काँक्रिटकरण करण्यात आले. तसेच मसूरकरवाडी महापुरुष पार बांधणे, पाटणकर वाडी येथील रस्त्यावर अडथळा ठरणारा वीज खांब एका दिवसात बाजूला करून दिला. यासोबत सडेवाडी स्मशान चौथरा उभरणीही करून देण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यावश्यक कामे पुर्ण होत असताना शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे, मंगेश गांवकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, अजित साटम, सुरेश साटम, दत्तात्रय लाड, सुनील लब्दे, सागर परुळेकर, दत्ता वराडकर, शशी नाटेकर, आण्णा गोसावी, दिपक गोसावी, किरण सावंत, विनोद सावंत, जयेश गोसावी, उदय गोसावी, प्रवीण हडकर, संतोष गोसावी, प्रमोद घागरे, प्रवीण हडकर, राज लब्दे, वैभव वराडकर, संदीप सावंत, बाब्या सावंत, सुरेंद्र मुळे, सिन्मय मुळे, प्रमोद सुर्वे, अनिकेत साटम, भांजी साटम, सोहम सावंत, अमोल पारकर, अरुण घाडी, दिलीप पुजारे, प्रमोद पुजारे, निलेश रेवडेकर, आशिष कोरगावकर, छगन गांवकर, शिवराम गांवकर, गणेश गांवकर, रोहन गांवकर, गोविंद गांवकर, निलेश गांवकर, प्रसाद माडये, भाई अपराज, अमोल माळगांवकर, आशीर्वाद तावडे, गणेश लाड, दर्शन लाड, केतन कावले, दाजी कावले, सावळाराम कावले यांसह प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. यासोबत भाऊ हडकर यांनी स्वतःचा डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला. स्वतः योगदान आणि यंत्रणा दिली. त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असे सांगण्यात आले.
आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते रस्ता घरापर्यत येईल
ज्या वाडीत रस्ताच नव्हता, वृद्ध, आजारी व्यक्तीना गंभीर स्थितीत औषध उपचारासाठी डॉक्टरकडे नेताना मोठी समस्या निर्माण व्हायची. वाहने येण्याचा कुठलाच मार्ग नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ग्रामस्थांची गरज आणि अत्यावश्यक परिस्थिती लक्षात घेता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने रस्ते उभारणी व पायवाटा काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ काम पुर्ण करून दिले. आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते आमच्या वाडीत आमच्या घरा पर्यत रस्ते येतील. मात्र आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांनी अशक्य ते शक्य केले आहे. असे सांगत लब्देवाडी, साटमवाडी व अन्य वाडीतील ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.
आमदार निलेश राणे यांची जनतेशी बांधिलकी
आमदार निलेश राणे यांचा नेहमीच विकासाचा दृष्टिकोन राहीला आहे. गावागावातील वाडी वस्ती पर्यत विकासकाम पोहचले पाहिजे. जनतेला अपेक्षित विकासकामे तात्काळ झाली पाहिजेत. विकास कामात राजकारण आणि मतांची गोळाबेरीज त्यांनी कधी केली नाही. मतदारसंघ आणि जनतेचा सर्वांगीण विकास हेच लक्ष आमदार निलेश राणे यांचे आहे. त्यांच्या याच विकासाच्या संकल्पनेतुन जनहिताच्या दृष्टीने चिंदर गावातील प्रलंबित व ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज असलेली विकासकामे पुर्ण करण्यात आली. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.







Subscribe to my channel






