मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम सभापती पूनम चव्हाण यांनी केले स्वागत : आ. निलेश राणे यांचे मानले आभार
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे डॉ. बागडे मालवण ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले असून मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम सभापती पूनम चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
डॉ. बागडे यांना ९ वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी सोलापूर महिला रुग्णालय येथे एक वर्ष, सायन हॉस्पिटलमध्ये तीन वर्ष तर प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे ५ वर्ष अशी ९ वर्ष आरोग्य सेवा दिली आहे. त्यामुळे मालवण च्या जनतेची मोठी मागणी आमदार निलेश राणे यांच्यामुळे निकाली निघाली असून आरोग्य सभापती म्हणून पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.