
कासार्डेत आमदार प्रमोद जठारांचा ओबीसी समाज बांधवांकडून भव्य नागरी सत्कार; कृतज्ञतेचा वर्षाव
कणकवली : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी लावून धरलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कासार्डे येथे OBC बांधवांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा रविवारी कासार्डेत कृतज्ञतापूर्वक नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांच्या OBC प्रमाणपत्राचा प्रश्न थेट सभागृहात उपस्थित करणारे प्रमोद जठार यांनी त्यानंतरही हा विषय सोडला नाही. गेल्या दोन वर्षांपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी हा प्रश्न धसास लावला. या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून, महायुती सरकारच्या माध्यमातून संबंधित अडचणी दूर करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आल्याने पात्र वैश्यवाणी समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
OBC प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी केलेल्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे येथे ओबीसी समाजबांधवांनी आमदार प्रमोद जठार यांचा नागरी सत्कार केला. यावेळी हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या समाजघटकांबाबत सकारात्मक भूमिका घेत OBC मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांबद्दलही महायुती सरकारचे आभार मानण्यात आले.
समाजाच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार!
OBC प्रमाणपत्राचा प्रश्न हा केवळ कागदपत्रांचा विषय नसून पात्र समाजबांधवांच्या हक्काचा आणि न्यायाचा प्रश्न आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजाच्या प्रश्नांसाठी विधिमंडळापासून शासनाच्या विविध स्तरांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका यापुढेही कायम ठेवण्याचा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे पात्र वैश्यवाणी समाजबांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, समाजासाठी हा महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.
कार्यक्रमाला बुवा संतोष कानडे, संतोष पारकर, बाळा जठार, प्राची ईसवलकर, सुधीर नकाशे, सुनील खाडये, चंद्रकांत जठार, नेहा दीपक माईणकर, सौ. श्री. विकास पाडगांवकर, सुनील तुकाराम वामणे, महेंद्र चंद्रनाथ सावंत, बाजीराव जनार्दन घोरपडे, रमेश प्रभाकर जामचे, सुरेश नारायण पाटणकर, श्रीकृष्ण कोकाटे, विलास पाटणकर, संतोष माळिणकर, उदय सावंत, नितीन निळकंठ, माणिकराव सराफ, प्रमोद पाटणकर, ओंकार साठे, अनिल घाडी, संजय घाडी, प्रदीप नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय विठ्ठल नकासे आणि श्री. दिगंबर ऊर्फ बंड्या मांजरेकर यांच्या वतीने करण्यात आले.






Subscribe to my channel






