पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात सेवा अभियानाचा श्रीगणेशा…!

विलयेतील मेढेकरवाडीत नळपाणी योजनेचा आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘सेवा अभियानाला’ राजापूर तालुक्यातील विलये गावातून उत्साहात सुरुवात झाली. विलये येथील मेढेकरवाडीमध्ये नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांमध्ये जनतेच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून मेढेकरवाडीतील नागरिकांसाठी नळपाणी योजनेचा पहिला उपक्रम हाती घेण्यात आला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राजापूर तालुक्यात विविध सामाजिक आणि जनसेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यावर या अभियानाचा भर राहणार आहे. ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ या भावनेतून हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, विविध गावांमध्ये लोकहिताचे उपक्रम घेण्यात येणार आहेत. विलये येथील नळपाणी योजनेच्या शुभारंभाने या सेवा अभियानाला राजापुरातून औपचारिक सुरुवात झाली.

error: Content is protected !!