पाट हायस्कुलच्या दिया सामंत हिला दहावीत ९९.८० % गुण

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील एस. एल. देसाई विद्यालय पाटच्या कु. दिया निलेश सामंत हिने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. कु. दिया ही वेंगुर्ल्याचे भाजप उपतालुकाअध्यक्ष, आदिनारायण सोसायटी चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांची सुपुत्री आहे. तीच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!