
मालवण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘सृजन’ संघटन प्रक्रियेतून निवड करण्यात आलेले सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या ‘सृजन’ संघटन उपक्रमांतर्गत पारदर्शक आणि कार्यक्षम प्रक्रियेतून राज्यातील नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या नूतन जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक कौशल्याला चालना देण्यासाठी नाशिक येथे १० दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असून, ते राज्यभरातून आलेल्या नूतन जिल्हाध्यक्षांना पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि संघटन विस्ताराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
अरविंद मोंडकर यांच्या सत्कारप्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी तसेच राज्यभरातून आलेले नूतन जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Subscribe to my channel






