
मालवण : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळ आणि बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाला सदिच्छा भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार राणे यांच्या भेटीमुळे दोन्ही मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आमदार राणे यांनी बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळालाही भेट दिली. दोन्ही मंडळांच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य सुरू असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, शहरप्रमुख राजू बिडये, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, दिव्या दीपक पाटकर, अमृता अनिकेत फाटक, स्मिता प्रभाळे, साई पारकर, कुणाल खानोलकर, सुशील शेडगे आणि मयू पारकर उपस्थित होते.
भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या वतीने सुष्मा तायशेटये, सुशांत तायशेटये, सुचिता तायशेटये, राजू आचरेकर, भाई हळदणकर, सिद्धी हळदणकर, प्रकाश करंगुटकर आणि मनिषा करंगुटकर यांच्यासह मंडळाचे सदस्य व भाविक उपस्थित होते.
बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष मिथुन शिगले यांच्यासह अण्णा राजापूरकर, राहुल हराजकर, मुन्ना हराजकर, सुमित हसोळकर, राजू कासले, गौरव कांबळे, मेघनाथ कांबळे, संकेत हसोळकर, सुधा कासले, भरत जाधव, सागर वाघेला, जितू पांचाळ आणि सुमेध जाधव यांच्यासह मंडळाचे सदस्य, कुटुंबीय व महिला सदस्य उपस्थित होते.
दोन्ही मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिकांच्या सहकार्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांतून उत्सव साजरा केला जात आहे.







Subscribe to my channel






