
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार
सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय मंत्री स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली असून नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला नवीन नाव देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.







Subscribe to my channel






