रेवतळेच्या मैदानात नारळांची ‘रंगतदार लढत’; शरबुद्दीन अथनीकर विजेता

तनय माणगावकर, यश खोत, वैभव खुरंदाळे अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याहस्ते उद्घाटन

मालवण : महापुरुष मित्रमंडळ, रेवतळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक नारळ लढविण्याच्या स्पर्धेत शरबुद्दीन अथनीकर याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. चुरशीच्या लढतींनी रंगलेल्या या स्पर्धेत तनय माणगावकर याने द्वितीय, यश खोत याने तृतीय तर वैभव खुरंदाळे याने चतुर्थ क्रमांक मिळवला. तब्बल १२८ स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने रेवतळे परिसरात दिवसभर नारळ लढतींचा थरार पाहायला मिळाला.

विजेत्या शरबुद्दीन अथनीकर याला १२ हजार १२ रुपये रोख व चषक, तर द्वितीय क्रमांकाच्या तनय माणगावकर याला ६ हजार ६६ रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

या पारंपरिक खेळाचा आनंद घेण्यासाठी मालवण शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी तसेच पर्यटक रेवतळे येथे दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

स्पर्धेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, नीना मुंबरकर, अमेय बादेकर, सौगंधराज बादेकर, नागेश चव्हाण, पंकज गावडे, शुभम लुडबे, सिद्धेश मांजरेकर, सुमेध मांजरेकर, निनाद बादेकर, सर्वेश लुडबे, गौरव कांबळी, सागर नरे, नितीन हडकर, सचिन हडकर, रमाकांत फाटक, बाबू हडकर, अक्षय मांजरेकर आदी उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांना नगरसेविका नीना मुंबरकर, ललित चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, राजीव बादेकर, आदित्य चव्हाण, मयुरेश फाटक, सिद्धेश फाटक, सुरज भगत, राखी हडकर, अजू कांबळी, सचिन कांबळी, राजा मांजरेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन सुशील मोर्ये यांनी केले. महापुरुष मित्रमंडळाच्या नियोजनामुळे स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!