देवबाग येथे आयोजित समुद्री जीवांबाबत प्रतिसाद आणि संवर्धन कार्यशाळेत अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रामाराव यांची ग्वाही


मालवण : मालवण मरीन सेंचुरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच ठेवून पुनर्रचना तयार केली आहे. स्थानिक उपजिविकेचे घटकांना विचारात घेऊनच मालवण मरीन सेंचुरीला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन विभाग) एस व्ही रामाराव यांनी दिली. त्याचप्रमाणे वन परिक्षेत्र मालवण मधील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असून स्थानीकांशी संवाद राखण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा विभागामार्फत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
देवबाग येणे ओशन ब्लिस हॉटेलच्या सभागृहात कांदळवन विभाग, वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, आणि बॉम्बे नाचरळ नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्री जीवांबाबत प्रतिसाद आणि संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) वर्षा कोळेकर, उपसंचालक कांदळवन प्रतिष्ठान मानस मांजरेकर, डी एफ ओ राजेंद्र मगदूम, डॉ. दिनेश विन्हरकर, विभागीय वन अधिकारी (दक्षिण कोकण) कांचन पवार, उपसंचालक- वेटलँड्स प्रोग्राम, BNHS. डॉ. सथियासेल्वम, सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन विभाग (दक्षिण कोकण)प्रियंका पाटील, सुनील सावंत, सत्यवान सुतार परिमंडळ वन अधिकारी, संदीप कुंभार सुहास पाटील वनक्षेत्रपाल , मोहन उपाध्ये , श्रीरंग परीट, सदानंद परब, सावळा कांबळे वनपाल, एम एम बी, मत्स्य विभाग यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रामराव म्हणाले, किनारपट्टीवरील सागरी जीवांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कांदळवन विभाग कटिबद्ध आहे. या कार्यात स्थानिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. कांदळवन विभाग आणि स्थानिकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. यासाठी स्थानिक पर्यावरण मित्र आणि प्रशासनाचे संबधित विभागाचं अधिकारी मिळून एक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामाध्यमातून दर तीन महिन्यातून किमान एकदा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
जखमी सागरी जीवांसाठी तत्काळ उपचार मिळत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू करा. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात येईल. सागरी जीवांच्या बचाव कार्यात स्थानिकांना अनेकदा अडचणी येतात यासाठी रेस्क्यू उपकरणे खरेदी साठी मंजुरी देण्यात येत आहे. मालवण येथील कार्यालयामधील रिक्त पदे भरण्यात येतील असेही श्री रामराव यावेळी म्हणाले. या चर्चासत्रात अक्षय रेवंडकर, आनंद बांबार्डेकर यांसह अन्य सदस्यांनी भाग घेतला.
कार्यशाळेत सागरी सस्तन प्राण्यांची ओळख, जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आल्यास कसे हाताळणे, जलचर मोबाईल अँपचा वापर, जखमी समुद्री कासवांची हाताळणी, समुद्री पक्षांचे व्यवस्थापन, मच्छीमारांची नुकसान भरपाई योजना, समुद्री कासवाचे संवर्धन, आदी विषयांवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

Subscribe to my channel




