जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्या उपस्थितीत युवकांचा मनसेत प्रवेश
मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सुकळवाड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्या मनसे मार्फत आगामी कालावधीत देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष धीरज परब व प्र. तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, शहर अध्यक्ष सागर जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष सूरज पुजारे, संतोष मोरजकर, आशिष मुसळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ओंकार म्हसकर, राजेश गोगले, अक्षता आटक, नागेश तर्वे यांच्यासह इतरांनी मनसेत प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.