अभिनेत्री क्रांती रेडकरची आर. के. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये “शॉपिंग”

मालवण मधील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच सेलिब्रिटींना भुरळ

मालवण : आपल्या वैविध्यपूर्ण सेवेसाठी जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात रविवारी प्रख्यात अभिनेत्री क्रांती रेडकर हीने भेट देऊन शॉपिंग केली.

‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’ हे शॉप जिल्ह्यात प्रसिद्ध असून माफक दर, दर्जेदार वस्तू हे या दुकानाचे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यातून अनेक ग्राहक या शॉपमध्ये खरेदीसाठी नेहमीच येत असतात. ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’चे मालक हेमचंद्र कोयंडे ग्राहकांना विशेष सवलती देताना सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सही लॉन्च करतात. यामुळे ग्राहक नेहमीच समाधानी असतो. या शॉपमध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि उत्तम दर्जाची असते. त्यामुळेच जिल्ह्याभरातून ग्राहक ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’कडेच येतो. त्यामुळे ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अभिनेत्री क्रांती रेडकर सुद्धा खरेदीसाठी या ठिकाणी पोहोचली. क्रांतीने आपल्याला घरात आवश्यक असलेल्या वस्तू येथूनच खरेदी केल्या. त्यामुळे मालवणच्या ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ ची विश्वासार्हता सर्वसामान्य ग्राहकांपासून सेलिब्रिटी पर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!