सिंधुदुर्गात उबाठाला धक्का ; माजी आ. राजन तेली शिवसेनेत…

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिमोल्लंघन

सिंधुदुर्ग : दसऱ्याच्या मुहूर्तावर उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील नेते माजी आमदार राजन तेली यांनी सिमोल्लंघन करत उबाठाला धक्का दिला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.

भाजप मध्ये कार्यरत असणाऱ्या राजन तेली यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतरच्या काळात ते उबाठा मध्ये फारसे सक्रिय दिसून आलेले नव्हते. परंतु, काही महिन्यांपासून राजन तेली भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र बुधवारी त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजन तेली यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग असून त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील शिवसेना पक्षाला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!