आडवली मालडी जि. प. मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

सोनाली सुनील घाडीगावकर व दीपक चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी ओवळीये येथील श्री रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सोनाली घाडीगांवकर व पं. स. उमेदवार दीपक चव्हाण यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा मतदार संघ १९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी ठाणपणे उभा असून या निवडणुकीत देखील आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठीशीच राहील, असा विश्वास गावप्रमुख दादा परब यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, गावप्रमुख दादा परब समीर सावंत, पपू निर्गुण, अंबाजी सावंत, बबन परब, राजू परब, अविनाश घाडीगावकर, अशोक परब, जयसिंग जाधव, आशुतोष सावंत, शिवा निर्गुण, प्रदिप मेस्त्री, मकरंद राणे, विश्वास परब, परशुराम गावकर, संतोष कदम, प्रकाश कासले, प्रशांत परब, अनिकेत परब, सुशांत घाडीगांवकर यांच्यासह हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी व अन्य ग्रामस्थ तसेच शिवसेना, भाजप व आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विभागातील भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते एकसंघ असून हा विभागाचा विकास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे हेच करु शकतात. त्यामुळे ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत देखील महायुतीचे उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर व दीपक चव्हाण यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास दादा परब यांनी व्यक्त केला. तर राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण यांनी देखील यावेळी विचार मांडले. या विभागातील महायुतीच्या उमेदवार सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!