कणकवली, सावंतवाडीत कंटेन्मेंट झोन जाहीर ; दुकाने- आस्थापने बंद राहणार

कणकवली मध्ये ७ तर सावंतवाडी मध्ये १४ कंटेन्मेंट झोन निश्चित

नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी ; आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत होणार कारवाई

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कणकवली आणि सावंतवाडी मध्ये काही भागात कंटेन्मेंट झोन लागू केले आहेत. या परिसरात दुकाने, आस्थापना आणि वस्तुविक्री बंद राहणार असून नागरिकांच्या येण्या जाण्यास आणि वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. कणकवली तालुक्यात ७ तर सावंतवाडी तालुक्यात १४ कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १००१ सक्रिय रुग्ण असून आज नव्याने १९७ रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेला कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

कणकवली तालुक्यात ७ कंटेन्मेंट झोन लागू

कणकवली तालुक्यात ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. यामध्ये उबर्डे-गावठाण येथील परिसर, मेहबुबनगर-बोबडेवाडी येथील परिसर, सडुरे-राववाडी येथील परिसर हा दिनांक २० जानेवारी २०२० पर्यंत कंटेन्मेंट झोन असेल तर उबर्डे- तेलीवाडी, मेहबुबनगर येथील परिसर, सांगुळवाडी -मगामवाडी येथील परिसर हा २२ जानेवारी २०२२ पर्यंत कंटेन्मेंट झोन असेल. उबर्डे- केळकरवाडी येथील परिसर २३ जानेवारी २०२२ पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल, कणकवली तालुक्यातील व त्यांच्या आजुबाजूचा परिसर व कोरोना बाधीत क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या सर्व गावे, वाड्या यामधील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून व दवंडी देवून संबंधित तलाठी, गामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिध्दी द्यावी. स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्यास मुळ ठिकाणी स्थलांतर करण्यास परवानगी दिली असेल तरी कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ व ५८, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ७१,१३९ आणि भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश उपेंद्र तामोरे, उपविभागीय दंडाधिकारी, कणकवली यांनी दिले आहेत.

सावंतवाडी तालुक्यात १४ कंटेन्मेंट झोन लागू

सावंतवाडी तालुक्यात १४ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. सावंतवाडी सालईवाडा – राजरत्न कॉम्प्लेक्स, सबनिसवाडा येथील तुळजा आर्केड डी वॉर्ड, बाहेरचावाडा येथील सी वॉर्ड नवीन इमारत सदनिका, सावंतवाडी -माठेवाडा येथील बी वार्ड, सावंतवाडी- माठेवाडा येथील बी वॉर्ड गणेश रेसिडन्सी, सावंतवाडी वैश्यवाडा येथील वॉर्ड बी, माठेवाडा येथील वॉर्ड बी, सालईवाडा येथील वॉर्ड एफ सर्वोदयनगर, सावंतवाडी सालईवाडा येथील वॉर्ड एफ, सावंतवाडी- खासकीलवाडा, सावंतवाडी- खासकीलवाडा येथील मयुर प्लाझा वरिल सर्व ठिकाणाच्या परिसर हा दि. २४ जानेवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन असेल तर सावंतवाडी- माठेवाडा येथील वॉर्ड बी, खासकीलवाडा येथील सदनिका, खासकीलवाडा येथील कल्पना रेसिडेन्सी येथील परिसर दि. २५ जानेवारी २०२२ पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व आस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल, सावंतवाडी तालुक्यातील व त्यांच्या आजुबाजूचा परिसर व कोरोना बाधीत क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या सर्व गावे, वाड्या यामधील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून व दवंडी देवून संबंधित तलाठी, गामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिध्दी द्यावी. स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्यास मुळ ठिकाणी स्थलांतर करण्यास परवानगी दिली असेल तरी कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ व ५८, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ७१,१३९ आणि भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशांत पानवेकर उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी दिले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!