टोलनाका प्रकरणी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करणार

रविकिरण तोरसकर यांची माहिती ; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे मुंबई -गोवा महामार्गावर टोल नाका उभारण्यात आला आहे. त्यासंदर्भात सर्व राजकिय पक्षांनी व सामाजिक संघटनानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफीची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात मच्छीमार, शेतकरी- बागायतदार, व्यापारी, पर्यटन, मालवाहतूक दार, बांधकाम व्यावसायिक तसेच इतर संघटनांनी सुद्धा हीच भूमिका घ्यावी व त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे. यासाठी लवकरच जिल्हास्तरीय कृती समितीचे गठन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मच्छिमार संघाचे सदस्य रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांनी दिली आहे.

या समितीमध्ये सर्वांचा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे. तरी समितीत काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी आपल्याशी ९४२२६३३५१८ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. तोरसकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!