मालवण : भाजपचे नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी गाबीत समाज हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या या विषयात सदरचे पुस्तक मार्गदर्शक म्हणून उपयोगी येईल असे मत आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. तसेच सद्य स्थिती मधील समाज संदर्भात असलेल्या समस्या आणि सोडवणूक या विषयात लवकरच विस्तृत चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे असे सांगितले.
आमदार प्रमोद जठार यांनी मंत्रालय स्तरावर समाज संदर्भात विषयात पाठपुरावा करावा. तसेच विधानपरिषद सभागृहाचा उपयोग समस्या सोडवणूक, तसेच शासकीय योजना यांचा लाभ होण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा उपस्थित गाबीत समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
यावेळी मालवण नगरपालिका गटनेत्या सौ.अन्वेषा आचरेकर, नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, सौ. सेजल परब, सौ. पूजा सरकारे, श्री.सन्मेष परब, श्री. भाई कासवकर, श्री.दाजी सावजी, श्री.सुरेश बापर्डेकर, श्री.मनोज मेथर, श्री.आपा मलांडकर, श्री.खोबरेकर सर, विष्णू धावडे व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.