मेढा जय गणेश मंदिरात उद्या (शनिवारी) ई श्रम कार्ड शिबिर

माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर यांचे आयोजन

मालवण : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (शनिवारी) १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेढा येथील जय गणेश मंदिरात ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच लाखांचा मोफत विमा असणार आहे. यासाठी नागरिकांची ई श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. तरी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश कुशे आणि सौ. ममता वराडकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!