मच्छिमार बांधवांच्या समुद्रातील सुरक्षिततेसाठी मंत्री नितेश राणेंच्या खात्याकडून सॅटेलाईट फोन उपलब्ध 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मच्छिमारांना प्रतिकात्मक स्वरूपात ५ सॅटेलाईट फोनचे वितरण

मुंबई : राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात ५ सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध होणार आहे.

समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसतानाही मच्छिमारांना किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता यावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी तसेच हवामान व सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मच्छिमार बांधवांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बीएसएनएलच्या सहकार्याने उपलब्ध होणारी ही सॅटेलाईट फोन सुविधा खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. यामुळे समुद्रातील सुरक्षा, आपत्कालीन मदत, बचावकार्य आणि संप्रेषण व्यवस्था अधिक प्रभावी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!