“त्यांच्या” सामाजिक कार्याची दखल ; पोलीस अधीक्षकांच्या पत्नीकडून सत्कार

सौ. नेहा गणेश कोळंबकर, सौ. राधा गोविंद केरकर यांचा सन्मान

कुणाल मांजरेकर

मालवण : रक्तदान असो अथवा अन्य कोणतेही सामाजिक कार्य… या सर्व सामाजिक घडामोडींत अग्रणी असलेल्या सौ. नेहा गणेश कोळंबकर आणि सौ. राधा गोविंद केरकर या महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या पत्नी सौ. समीक्षा दाभाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्लोबल रक्तदाते समूहाच्या महिला प्रतिनिधी सौ. नेहा गणेश कोळंबकर आणि सौ. राधा गोविंद केरकर या महिला सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून रक्तदानासह अन्य कार्यातही त्या नेहमी धडाडीने सहभाग घेतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या पत्नी सौ. समिक्षा दाभाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांच्या पत्नी सौ. सुप्रिया ओटवणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!