निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय गेटजवळ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील जिल्हा काँग्रेस समित्यांना जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निषेध आंदोलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविलेले उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, तसेच काँग्रेसच्या विविध सेल व विभागांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, INTUC तसेच इतर विभागांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच तालुका काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!