सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्ग या संस्थेच्या नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत तर उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज यांची निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. गुरुवारी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत व उपाध्यक्ष श्री. मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी आपण व आपले सर्व सहकारी यांचे मार्फत मंडळास आवश्यक ते योग्य सहकार्य करू, असे श्री. दळवी म्हणाले.

जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या पोषक वाढीसाठी व सहकारी संस्था सक्षम बनविण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना कार्यक्षम बनविण्यासाठी बदलत्या काळानुसारचे सहकारी शिक्षण-प्रशिक्षण सहकारी मंडळामार्फत देणेत येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत व उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

नवनिर्वाचित संचालक मंडळ : श्री. विलासराव बा. ऐनापुरे, श्री. गजानन सु. गावडे, श्री. मधुसुदन के. गावडे, श्री. सुभाष रा. तळवडेकर, श्री. केशव र. नारकर, श्री. प्रकाश मु. सावंत, श्री. सुरेश ज्ञा. चौकेकर. संचालिका : श्रीम. कुंदा प्र. पै, श्रीम. प्रज्ञा प्र. परब. यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ उपस्थित होते.

error: Content is protected !!