दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न

सिसिटीव्ही फुटेज आले समोर ; आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातून आलेल्या एका तरुणाने स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे बंधू रोहन चव्हाण यांच्यासह आणखी एका स्थानिक तरुणाचा थोडक्यात जीव बचावल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांसह नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यात आला नाही, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!