जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींचा आडेली जि. प. मतदार संघात उबाठाला धक्का…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

वेंगुर्ले : आडेली जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उबाठाला खिंडार पाडले आहे. दाभोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह उपसरपंच, ग्रा.प. सदस्य आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये केला. या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला आहे. गावच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे या प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात हा भव्य पक्षप्रवेश झाला. प्रवेश कर्त्यांमध्ये दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ पपन बंदवलकर, ग्रा प सदस्य जया पवार, अर्चना दाभोलकर यांच्यासहित शाखाप्रमुख बाबा पेडणेकर, उपशाखाप्रमुख नैनेश करंगूटकर, महिला शाखा संघटिका सारिका हळदणकर, शाखाप्रमुख प्रकाश सागवेकर, माजी ग्रा प सदस्य स्नेहा बोवलेकरकर, समिधा बांदवलकर, दादा हळदणकर, दाभोली सोसायटी संचालक श्रीकांत चेंदवणकर, कार्यकर्ते गौतम दाभोलकर, चित्रा माडकर, शुभदा डीचोलकर, शिंदे शिवसेना उपशाखाप्रमुख भूषण प्रभुखानोलकर, अमित दाभोलकर माजी सदस्य दाभोली, वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर, वायंगणी ग्रा प सदस्य छाया नांदोस्कर, विद्या कांबळी यांच्यासहित वायंगणी विभाग प्रमुख आनंद दाभोलकर, उपशाखापृख अमित कामत, युवासेना विभागप्रमुख हर्षल सातर्डेकर, माजी ग्रा प सदस्य आकांशा दाभोलकर, माजी शाखाप्रमुख सुनील सावंत, महिला पदाधिकारी अश्विनी सावंत, बुथप्रमुख विनायक कामत, पोलिंग एजंट प्रमुख करण कांबळी, सोशलामीडियाचे आशुतोष दाभोलकर, तुषार पेडणेकर, खानोली ग्रा प सदस्य अमिता खानोलकर, माजी ग्रा प सदस्य सागर रांजणकर यांच्यासहित अंजली मयेकर, संजय खवणेकर, दिलीप आरेकर, तारक हळदणकर, संजय घारे, अनिल हळदणकर, अश्विनी हळदणकर, पूनम नांदोसकर, समीर मठकर माजी सदस्य मठ तसेच मठ येथील प्रथमेश मठकर, मंदार मठकर, राकेश मठकर मठ यांनी पक्ष प्रवेश केला.

error: Content is protected !!