मालवण तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल ९५.७३ टक्के…

वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाची वैदेही पालकर ९४.८६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम

मालवण : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर हिने ९४. ८६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाचा कला शाखेचा विद्यार्थी सखाराम गोसावी ९३.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निखिल भुर्के हा ८९.५० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के लागला आहे.

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९५.६९ टक्के लागला आहे. यात वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८६.२० लागला आहे. वाणिज्य शाखेतून निधी सावंत ८०. ८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय तर कामिनी पाटकर ७७.५० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. कला शाखेतून धैर्वी ढोलम ६८.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, बाबाजी गावडे ६८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सानिका घाडी ६३.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुधीर वराडकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. भाट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अनुष्का देसाई ही ५१७ गुण मिळवून प्रथम, मुग्धा गोसावी ४९९ गुण मिळवून द्वितीय तर चिन्मयी सामंत ही ४८२ गुण मिळवून तृतीय आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक हृषीकेश नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.२३ टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.७५ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला तर किमान कौशल्य शाखेचा निकाल ८० टक्के लागला. यात कला शाखेतून दीप्ती शिंदे ८३.५० टक्के गुण मिळवून प्रथम, निशा पाटकर ७८.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर मिताली मसुरकर ७८.१७ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून रुपाल धुरी ८४.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. विज्ञान शाखेतून अर्थ कुशे ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, स्मित मयेकर ८४.५० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कैवल्य मिसाळ ८१.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. किमान कौशल्य शाखेतून सुहानी पालव ७६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम, मिताली परब ७२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सखाराम कदम ७०.८३ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

भंडारी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.७३ टक्के लागला. यात विज्ञान शाखेतून लीनेश तारी ६३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, हिना म्हापणकर ५७.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर गौरवी गावकर ५७.१७ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. कला शाखेतून पार्थ मेस्त्री ७३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, श्रेया गावकर ७२.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रीहरी केळुसकर ५६.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून सृष्टी दिघे ८३.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, वेदिका निकम ७९.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर वैष्णवी सावंत ७८.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५३ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के व कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम – रिद्धी रवींद्र केळूसकर (४८७ गुण), द्वितीय – संजीवनी लक्ष्मण केळूसकर (४५१ गुण), तृतीय – हेमांगी उमेश चव्हाण (४३०) तर कला शाखेतून प्रथम – तन्वी गणेश जाधव (४३८ गुण), द्वितीय – मिनिषा मिलिंद धुरी (४११ गुण), तृतीय – निशांत नितीन शिरोडकर (३९९ गुण) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष विजय केनवडेकर आणि संस्था पदाधिकारी तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सलंग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेतून भाविका घाडीगावकर ५२.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय, कुणाल हडकर ५२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून रिया खोत ७७.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, आर्यन कदम ७६.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीक्षा घाडी ७५ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.

error: Content is protected !!