मालवणात जखमी गाईवर उपचार ; शिल्पा खोत यांच्यासह सजग नागरिकांचा पुढाकार

मालवण : मालवण शहरात एक गाय मागील दोन महिन्यांपासून शेपटीला जखम झालेल्या अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांनी पुढाकार घेत बजरंग दल व सजग नागरिकांच्या मदतीने या गाईवर डॉक्टरांमार्फत उपचार करून घेतले. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

मालवण मधील व्यापारी योगेश कांबळी यांनी सौ. शिल्पा खोत यांना या जखमी गाई विषयी माहिती दिली. त्यानंतर सौ. खोत यांनी तात्काळ डॉ. रजत दळवी यांना पाचरण केलं. या गाईच्या शेपटीला गेले दोन महिने जखम होती. या अवस्थेत एका वासरूचा ती सांभाळ करत होती. शुक्रवारी सकाळी या गाईला प्रथमोपचार देण्यासाठी सौ. खोत यांनी बजरंग दलला कळविले. सर्पमित्र स्वप्नील व यतिन खोत घटनास्थळी दाखल झाले. परंतु गाय हाताशी मिळाली नाही. तरीपण हार न मानता प्रणिप्रेमी तेजस नार्वेकर या गाईचा दिवसभर पाठलाग करत होता. 

अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आलं. रात्री ८ वाजता तात्काळ त्यांनी शिल्पा खोत यांना पाचारण केलं असता डॉ. दळवी व रजत दळवीना पाचरण करून भाई कोचरेकर गवंडीवाडा येथे त्यांच्या निवासस्थानी गाईला रेस्क्यू केलं. यावेळी भाजपच्या नगरसेवक उमेदवार मरीना फर्नांडिस यांची मदत घेत तसेच घटनास्थळी सर्प मित्र स्वप्नील परुळेकर, मयुरेश लुडबे, यतिन खोत, सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांनी धाव घेत गाईवर उपचार करण्यात यश आले. सौ. शिल्पा खोत यांनी डॉक्टरांसह सहकार्य करणाऱ्यां सोबत गाय वासरू खंबाळे गोशाळा यांचे आभार मानले.

error: Content is protected !!