युवा व्यापारी मयू पारकर यांची तीव्र नाराजी ; आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार


मालवण : मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावर नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपुर्ण मालवण शहारात हेच चित्र असून पालिका प्रशासनाच्या कारभाराची तक्रार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मालवण येथील युवा व्यापारी मयू पारकर यांनी दिली आहे.
मुळात यावर्षी गणेशोत्सव नियोजन बैठक अनेकवेळा रद्द करून गणेशोत्सवाच्या चार दिवस अगोदर घेण्यात आली. त्यातही प्रमुख अधिकारी नव्हते. त्यावेळी अनेक मुद्दे उपस्थितानी मांडले. मात्र त्यावर अपेक्षित कोणतीही कार्यवाही झाली नाही. रस्त्याचे अनेक खड्डे भरले नाहीत. मोक्याचा ठिकाणी साफसफाई नाही. अनेक ठिकाणी गटार साफसफाई अर्धवट त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. विसर्जनाचा ठिकाणी योग्य सुविधा नाहीत. रस्त्याचे काम केले नाही तसेच काही ठिकाणी स्लोप वर शेवाळ तसाच असून त्याठिकाणी उपाययोजना नाहीत. गवंडीवाडा मधील गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी दुर्गंधी साम्राज्य आणि तसेच रस्त्याचं म्हणजे स्लोप चे काम केले नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा. रस्त्यावर सांडपाणी वाहणे अश्या अनेक तक्रारी आहेत. याचा परिणाम गणपती बाप्पा आगमन व विसर्जन मार्गांवर दिसून आला. याबरोबर भटके कुत्रे यांची समस्या अधिकच तीव्र बनली आहे. हे कुत्रे अनेकांच्या अंगावर धावून येतात. तसेच मोकाट जनावरे यांचीही समस्या गंभीर आहे. त्यावरही कोणतीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे या सर्व कारभाराची तक्रार जिल्हाधिकारी यांसह पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे मयू पारकर यांनी सांगितले.

Subscribe to my channel




