नाना पाटेकरांच्या निधनाने मन सुन्न; ‘हक्काने विचारपूस करणारा जिवलग मित्र गमावला’

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

मालवण : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. ‘नारायण, तू कसा आहेस?’ असे हक्काने विचारणारा माझा एक अतिशय जवळचा मित्र आज मी गमावला आहे, या भावनेने मन व्यथित झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे.

नाना पाटेकर हे केवळ अष्टपैलू आणि महान कलाकार नव्हते, तर ते कोकणच्या मातीशी घट्ट नाते जपणारे खरे सुपुत्र होते. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप उमटवतानाही त्यांनी आपली माती, माणसं आणि सामाजिक बांधिलकी कधीही विसरली नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य समाज कधीही विसरू शकणार नाही. संकटग्रस्त माणसाच्या वेदनेशी जोडून घेत त्याच्या मदतीसाठी उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.

नाना आणि माझ्यातील वैयक्तिक आपुलकी, स्नेह आणि जिव्हाळा नेहमीच खास राहिला. त्यांच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एका जिव्हाळ्याच्या व्यक्तीची पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीचे, सामाजिक क्षेत्राचे आणि महाराष्ट्राचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या असामान्य कलाकृती आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नाना पाटेकर कायम स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पाटेकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे खा. राणे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!