मालवण नगरपरिषदेकडून सिंगल युज प्लास्टिक विरोधात विशेष मोहीम ; ६,६०० रुपये दंडाची वसुली

मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील भाजी मार्केट, फळ विक्रेते, किराणा दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईत प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन एकूण ६,६०० इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सदर मोहीम मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्रीमती संध्या गवळी व स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत नगरपरिषदेचे मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत तपासणी व जनजागृती केली. मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून, सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी Single Use Plastic चा वापर टाळावा, असे आवाहन मालवण नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!