आ. वैभव नाईकांच्या वाढदिनी प्रशासनाकडून अनोखी भेट !

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने मालवण तालुक्यातील जनतेला आपत्ती निवारणार्थ अनोखी भेट उपलब्ध करून दिली आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचावासाठी किल्ले सिंधुदुर्ग व खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून दोन बोटी उपल्बध करण्यात आल्या असून या बोटी शनिवारी आमदार वैभव नाईक आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते वायरी आणि मसुरे ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आल्या.

किल्ले सिंधुदुर्ग व कालावल खाडी पात्रातील खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांना पावसाळा कालावधीत समुद्र व खाडी धोकाच्या पातळीवर असतो त्यावेळी बाहेर येणाचे मार्ग बंद असतात. अश्या आपत्कालीन स्थितीत येथील ग्रामस्थांना सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग कडून दोन बोट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपतकालीन स्थितीत अथवा अत्यावश्यक परिस्थितीत या बोटी येथील ग्रामस्थ, रहिवाशी यांच्यासाठी निश्चितच महत्वाची सेवा बजावतील, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!