कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे, मंदार लुडबे, मनोज लुडबे, भाई मांजरेकर, शैलेश लुडबे, संदीप लुडबे, भगवान लुडबे, किशोर लुडबे, किशोर चव्हाण, जगदिश हडकर, बाबू गावकर, उदय लुडबे, अक्षय नरे, विजय तळगावकर, दिपक केळुसकर, कांता लुडबे, सुरेश लुडबे, प्रशांत बिरमोळे, राजेश पारधी, प्रसाद देऊलकर, दिपु माडये, साईनाथ लोके, अनिल गांवकर, आदित्य खाजनवाडकर यांच्यासह डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ३७ जणांनी रक्तदानाचा लाभ घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!