मालवणात महास्वच्छता अभियान; कांदळवन परिसराची स्वच्छता

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत नागरिक, स्वयंसेवक व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान २०२६ अंतर्गत मालवण शहरातील विविध भागांत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सार्वजनिक परिसरासह कांदळवन परिसराच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला.

अभियानादरम्यान रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटविणे, झाडी-झुडपांमधील कचरा साफ करणे, तसेच कांदळवन परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. संकलित कचऱ्याची वाहतूक करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत नागरिक, स्वयंसेवक आणि नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले. कांदळवन परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालणे आणि किनारी पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.कांदळवन हे किनारी पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असून त्याचे संवर्धन करण्यासाठी परिसरात कचरा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहभागातून ती लोकचळवळ बनू शकते, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

error: Content is protected !!