कुडाळ, मालवण नंतर आता वेंगुर्ल्यात एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र

मालवण : दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेजचे पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आले आहे.

वेंगुर्ल्यात वेंगुर्ला-शिरोडा रोड, मानसीश्वर पेट्रोलपंपाच्या जवळ हे केंद्र सुरु झाले आहे. यापूर्वी कुडाळमध्ये आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोडजवळ, माळगावकर हाऊस येथे तर मालवणात म्हाडा कॉलनी आमंत्रण हॉटेल नजिक पॉलिटेक्निक रोड, मालवण येथे प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. ही सर्व केंद्रे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सुरू राहणार असून वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा, शिरोडा, रेडी, आरोंदा, आजगाव तसेच दोडामार्ग, बांदा, ओटवणे या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वेंगुर्ल्यात ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयटीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी केले आहे. वेंगुर्ला केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी मानसीश्वर पेट्रोल पंपाचे मालक व उद्योजक विलास कुबल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या संस्थेबद्दलच्या सहकार्याबद्दल व पाठिंब्याबद्दल एम. आय. टी. एम. संस्थेतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तरी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी 9657258996/ 9405330277/ 8390979536 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!