सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी नामांकित भजनी बुवांची भजनसेवा
मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने यंदा सलग ११ व्या वर्षी २९ जुलै पासून भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव सुरु आहे. या महोत्सवाची सांगता आज मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी नामांकित भजनी बुवांची भजन सेवेने होणार आहे.
मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके), रात्रौ ८.३० वा. श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर मुंबई, (बुवा लक्ष्मण गुरव) यांची भजने सादर होणार आहेत. तरी भाविक आणि भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.