माळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना कृषी विषयक साहित्याचे वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
मालवण : माळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामस्थांना कृषी विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच याठिकाणी पीएम किसान E-KYC व आरोग्य कार्ड कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व माळगाव ग्रामपंचायत सरपंच निलेश खोत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच संदीप जाधव, माळगाव गावचे भाजप कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य चेतन साळकर, निधी खोत, कविता कसले, शुभांगी फणसेकर, पडेलकर सर, सुभाष खोत, दीपक मालवणकर, सत्यवान भोगले, गौतम खोत यांच्यासह ग्रामस्थ संदीप भोसले, प्रभाकर खोपकर, काका पातडे, गोविंद सुर्वे, जनार्दन सुर्वे, अनंत जाधव, बाबा साळकर, पपी जाधव, अण्णा हरकुळकर, दिगंबर पळसमकर, मेघश्याम परब, सुधीर परब, अनिल परब, गुरू परब, संदेश परब, सागर गावकर, संतोष परब, सुरेश परब, पिंटो परब, दीपक बागवे, हरी चव्हाण, अशोक कसले, आबा शेलार, गीता शेलार यांच्यासह माळगाव गावातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.