विनायक मानवर याचा दांडी येथे सत्कार !

पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर व भाजप शहर अध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांचा पुढाकार

मालवण : शहरातील दांडी येथील विनायक तानाजी मानवर याची भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने दांडी येथील रहिवाशी व पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर आणि भाजपच्या मालवण शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर यांनी पुढाकार घेत त्याचा सत्कार केला. 

विनायक तानाजी मानवर या २१ वर्षीय युवकाने पहिली ते सातवी दांडी प्राथमिक शाळेमधून शिक्षण घेतले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एन. सी. सी. कॅडेट म्हणून बाहेर पडून त्याची भारतीय नौदलात अग्निवीर म्हणुन निवड झाली आहे. विनायक हा गेली २५ वर्षे दांडी येथे वास्तव्यास असून ३१ ऑगस्टला तो नौदल सेवेत हजर होत आहे. त्याबद्दल अजित आचरेकर व सौ. अन्वेशा आचरेकर यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ऋग्वेद आचरेकर, सुजल केळुस्कर, यतीन आचरेकर, सचिन आचरेकर, मॉरिस फर्नांडीस, बबन आचरेकर, शंकर आचरेकर, जनार्दन आचरेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!