वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे शिमगोत्सव स्पर्धा ; आदित्य ठाकरेंची उपस्थिती
रोंबाट व राधानृत्य या दोन प्रकारात होणार स्पर्धा ; महाविकास आघाडीचे आयोजन
कुडाळ : महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिमगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ क्रीडा संकुल मैदान (तहसील कार्यालया शेजारी) येथे ही स्पर्धा होणार आहे. रोंबाट सादरीकरण, राधानृत्य सादरीकरण या दोन प्रकारात स्पर्धा होणार असून शिमगोत्सव स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
रोंबाट सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक रोख रु. २१ हजार, द्वितीय पारितोषिक १५ हजार, तृतीय पारितोषिक ८ हजार, व उत्तेजनार्थ ७ हजार तर राधानृत्य सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक रोख रु. ११ हजार, द्वितीय पारितोषिक ७ हजार, तृतीय पारितोषिक ५ हजार व उत्तेजनार्थ २ हजार ५०० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर विजेत्या संघांना आकर्षक चषके देऊन गौरविण्यात येणार आहे. कोकणची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने ही शिमगोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी २६ मार्च पर्यंत विनय गावडे (नेरूर) मोबा- 9421456156, 9420207902 यांच्याकडे करावी असे आवाहन महाविकास आघाडी कुडाळच्या वतीने करण्यात आले आहे.