फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अचानक जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

वॉर्नने 12 तासांपूर्वी शेवटचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी रोडे मोर्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, तो आमच्या खेळाचा महान खेळाडू होता. त्यांनी अनेक तरुण मुला-मुलींना प्रेरणा दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!