ना. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडाई मंदिरात उद्या जलाभिषेक सोहळा
दुपारी महाप्रसाद ; भाविकांनी लाभ घ्यावा : ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन
मालवण : रामनवमी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घुमडे येथील घुमडाई मंदिरात रविवारी १० एप्रिल रोजी सकाळी जलाभिषेक सोहळा तर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपचे नेते तथा घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्या घुमडाई मंदिरात सकाळी घुमडाई देवीवर जलाभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सामंत यांनी केले आहे.