मालवण : १९९० पासून राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, अशा शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सरोजताईंना श्रद्धांजली अर्पण केली.
सरोज परब यांनी प्रदीर्घ काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करताना आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली. राणे साहेबांच्या सोबत त्यांनी १९९० पासून निष्ठेने काम केले. त्यांच्या कार्यातील योगदान आणि सहवासातील आठवणी सदैव स्मरणात राहतील, अशी भावना निलेश राणे यांनी व्यक्त केली.
सरोजताईंच्या निधनाने एक निष्ठावंत ज्येष्ठ सहकारी गमावल्याची भावना मनात असून, त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे, असेही त्यांनी म्हटले. या दुःखद प्रसंगी आपण सरोज परब यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना निलेश राणे यांनी केली.