कणकवली भाजपमय : पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बाजारपेठेतील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात हे आज सर्वांनी पाहिले : भव्य प्रचार रॅलीनंतर मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पटकी देवी ते पटवर्धन चौक अशी प्रचंड उत्साहात प्रचार रॅली संपन्न झाली. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. भाजपने कणकवली शहरातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी प्रचार रॅली काढली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. भाजपच्या प्रचार रॅलीत कार्यकर्ते व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

पटकीदेवी येथून रॅलीला शुभारंभ झाला. रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १३ चे उमेदवार बंडू हर्णे, भाजपचे कणकवली विधासभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उमेदवार राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्नील राणे, माधवी मुरकर, मेघा गांगण, सावी मुंज, सुप्रिया नलावडे, गौतम खुडकर, आर्या राणे, मेघा सावंत, मयुरी चव्हाण, मनस्वी ठाणेकर, अण्णा कोदे, विश्वजित रासम, संजय कामतेकर, राजश्री धुमाळे, विशाल कामत, राजू गवाणकर, भरत उबाळे, संदीप नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटकी देवी येथून सुरू झालेल्या रॅलीचा आप्पासाहेब पटवर्धन चौक सांगता झाली. रॅली दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी व नागरिकांची संवाद साधला.

खा.नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी जनता, भाजपच्या पाठीशी

आम्ही कोणावर टीका टिपणी करत नाही. ही कणकवलीची जनता वर्षानुवर्षे खास. नारायण राणे साहेबांच्या बाजूने राहिलेली आहे. राणे साहेबांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले आहेत. कणकवली पासून खास. नारायण राणेंना तोडण्याचे यापूर्वीही प्रयत्न झाले. त्यांना या जनतेने यशस्वी होऊ दिले नाही. नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे प्रत्येक गल्ली गल्लीत खास. नारायण राणेंचा आवाज घुमताना दिसतोय. या आवाजाचे रूपांतर भाजपच्या विजयात होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री नितेश राणे म्हणाले, आम्ही शक्तिप्रदर्शन केलेलं नाहीय. परंतु जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात, जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात, भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभी आहे हे आज कृतीतून दिसून आलेलं आहे. कणकवलीकरांचा आमदार आता मंत्री पालकमंत्री आहे. पुढील पाच वर्षे परत एकदा सेवा करण्याची संधी द्या, आम्ही कणकवलीकरांच्या ईच्छा आकांशा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. आमच्यामागे शक्ती उभी आहे. एकदा संधी द्या पुढची पाच वर्षे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आता आमच्या प्रतिस्पर्धीना आमच्याविरुद्ध लढाई करण्यासाठी राणे कुटुंबातील एक सदस्य लागतो. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धीकडे स्वतःची शक्ती नाही. स्वतःची ओळख नाही. प्रत्येक गल्ली गल्लीत खास. नारायण राणेंचा आवाज घुमताना दिसतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री ही सर्व शक्ती कणकवलीकरांची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत. त्यामुळे कोणी कितीही टीका करूदे आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे ३ डिसेंबरला आमचे सर्व उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!