मालवण शिवसेना शाखेत आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

आ. नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; राजकीय सीमा ओलांडून अनेकांच्या शुभेच्छा

मालवणात विविध सामाजिक उपक्रम संपन्न ; ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य शिबिरात ३५० हून अधिकांचा सहभाग

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस येथील शिवसेना शाखेत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर राजकिय सीमा ओलांडून अनेकांनी आ. नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, आ. नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीत ज्यांना मोतीबिंदू समस्या आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी दिली आहे. आमदार वैभव नाईक यांनी दुपारच्या सत्रात याठिकाणी येऊन डॉक्टरांकडून शिबिराचा आढावा घेतला.

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी केक भरवून आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी, हृदयरोग तपासणी आणि रक्त तपासणी आयोजित करण्यात आली होती. या तपासणीसाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या शिबिरात २९८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील ४० जणांवर जिल्हा रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर ४८ जणांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यातील २० जणांना पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार होणार आहेत. आमदार वैभव नाईक यांनी दुपारी याठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर आणि मंदार गावडे यांनी आ. वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेवक यतीन खोत आणि महेंद्र म्हाडगुत यांनी आ. वैभव नाईक यांना एकत्रित शुभेच्छा दिल्या.

शिवसेना शाखेत वाढदिवस उत्साहात साजरा

येथील शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अरुण भोगले, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, गणेश कुडाळकर यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आ. वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर आदी उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी आ. वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मालवण तालुका महिला शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने दैवज्ञ भवन मालवण येथे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणीही आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून आमदार नाईक यांच्यावर शुभेच्छा वर्षाव करण्यात आला. तर तालुक्यात काही ठिकाणी शाळांमध्ये खाऊ व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी बांधकाम सभापती यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या वतीने फातिमा कॉन्व्हेंट येथे मुलांसमवेत केक कापून खाऊ वाटप करत आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर बंदर जेटी येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध दोन बोटींचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी तहसीलदार अजय पाटणे, बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आ. वैभव नाईक यांचे अभिष्टचिंतन केले.

तहसीलदार अजय पाटणे यांनी आ. वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते उमेश मांजरेकर यांनी आ. वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!