१०७ जणांनी घेतला लाभ ; माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्यावतीने वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०७ जणांनी तपासणी केली. या शिबिरात शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर नेत्रोपचार व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे मोफत करण्यात करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, डॉ. सुभाष दिघे, डॉ. सावंत ओरोस, राजन गवंडी, अमिता न्हिवेकर, दिपक कुडाळकर, भाई चव्हाण, किसन लुडबे, राजन आजगावकर, संजय पाताडे, ललीत तळवडेकर, गोविंद गावकर, दिवाकर गावकर, प्रमोद मराळ, शिवराम मराळ, गजा मराळ, चंदू मेस्त्री, शीला चव्हाण, अंबाजी लुडबे, राजा लुडबे, बाबा शेख यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.